शेतकर्यांच्या अनुदानात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालय अंबड यांनी 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून यामध्ये एक आरोपीला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सांयकाळी 6 वाजता सपोनि. मिथून घुगे यांनी दिली. शासनाने 2022 ते 2024 या काळात अतिवृष्टी, पूर, नापिकी, अवेळी पाऊस व दुष्काळग्रस्त शेतकर्यांना अनुदान दिले होते.