तुळजापूर विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार प्रकरणः खासदार ओमराजे निंबाळकर यांचा दिल्लीत सवाल तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ६००० बोगस मतदार आढळून आल्याच्या गंभीर प्रकरणाला आठ महिने उलटूनही पोलीस तपास ठप्प असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. यासंदर्भात २१ ऑगस्ट रोजी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये संताप व्यक्त केला.