नरखेड पोलीस स्टेशन येथे एसआय पदावर कार्यरत असलेले 54 वर्षीय संतोष शर्मा हे 28 ऑगस्ट ला नरखेड येथून काटोल येथे जात असताना धोत्रा मोदी जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे त्यांचा उपचार सुरू असताना उपचारादरम्यान 3 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजून पंधरा मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करीत आहे.