धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारीजवळील पांडवनगर परिसरात भीषण अपघातात राजस्थानहून कर्नाटकला लोखंडी माल घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉल्यांपैकी पुढच्या ट्रॉल्यासमोर अचानक गाय आल्याने चालकाने ब्रेक दाबला व मागील ट्रॉला त्यावर आदळला. धडकेत केबिन चक्काचूर होऊन चालक शिवा बेगवंशी (वय 26, रा. राजस्थान) गंभीर जखमी झाला. रुग्णवाहिका उशिराने आल्याने देवपूर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला स्वतःच्या वाहनातून भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.