जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेत 15 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणे कडून सोडवणूक करण्यासाठी या महिला लोकशाही देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.