सिरोंचा (विशेष प्रतिनिधी.) मादगी समाजबांधवांद्वारे अनुसूचित जातींमधील आरक्षणातील उपवर्गीकरण करण्याची मागणी अधिक जोर धरु लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शासन विरोधात आक्रोश व्यक्त करीत समाजबांधवांनी मादगी समाज संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी, (दि.19) तहसिल कार्यालयावर धडक दिली यावेळी शासन विरोधात जोरदार घोषणाजी करीत समाजबांधवानी तहसिल कार्यालय परिसर दणाणून सोडले यानंतर मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर केले.