24 ऑगस्टला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरात विनापरवानगी फिरणाऱ्या हद्दपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव निखिल उमरेडकर असे सांगण्यात आले असून आरोपीला शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. आरोपीला पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे