धानोरी फाटा येथील पीसीएस चौकाजवळ पहाटे २ वाजता प्रीतम मोबाईल दुकानात आग लागली. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यासाठी एक अग्निशमन वाहन तैनात करण्यात आले. आगीमुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आळंदी नगरपरिषद आणि पीएमआरडीएच्या सहकार्याने अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली.[