ग्रामीण भागात असलेल्या बाजार चौक वेलतुर येथे 23 आगस्ट शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नंदीबैल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की ग्रामपंचायत वेलतुर च्या वतीने नंदीबैल तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येउन यावेळी उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा करणाऱ्या चिमूकल्यना बक्षिसे वितरण करण्यात आले. तसेच सहभागी चिमुकल्या ना बक्षिसे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवर व पदाधिकारी व गावकरी नागरिक उपस्थित होते.