आम्ही सत्तेकडे बघत नाहीं, बदलापूरच्या विकासाकडे बघतो. सत्ता ही विकासासाठी असावी, स्वतःसाठी नसावी. मी सत्ता स्वतःसाठी कधी वापरली नाही आणि कार्यकर्त्यांनाही वापरू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार किसान कथोरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज दिनांक ८ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास बदलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.