मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघाच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश मोहिते वय 32 रा. कोल्हापूर याचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म दोन वर सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला.खूनप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बाटल्या गोळा करुन तेथेच रहात होता. सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्या सोबत दारूच्या नशेत वाद झाला असल्याचे कळते आहे. यावेळ