बोंडगावदेवी येथे डिजिटल लॅबचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येणार आहे.यावेळी कुंदा लोगडे पंचायत समिती सदस्य,धम्मपाल वालदे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,अनिल मानकर अध्यक्ष शाळा व्य.स,श्यामकांत नेवारे माजी जि.प. सदस्य,दीपक नेवारे,रतिराम कुरसुंगे,संजय गिरीपुंजे, संतोष शहारे,पतिराम मेश्राम,अमरचंद ठवरे ग्रामपंचायत सदस्य,नलिनीताई नेवारे आदि मान्यवर उपस्थित होते.