दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातून चंदनाचे झाड तोडून चोरून नेत असताना दौंड व कुरकुंभ पोलीसांनी पाठलाग करून चार जणांना पकडले. यादरम्यान एकजण पळून गेला आहे.संशियत आरोपींकडून 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवार (दि.29) सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.