बुधवार दिनांक 1 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान 'भारत परिक्रमा, भारत के रंग, नारि के संग 'चा 'गजर करीत रामटेक येथील मुख्य कार चालक डॉक्टर, लेखिका तसेच लिंका बुक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. अंशुजा किंमतकर, सहचालक समाजसेवी, उद्योजिका सौ लक्ष्मी म्हात्रे या रामटेक निवासी दोन साहसी महिला आपल्या कार क्र. एम एच 40 सीएक्स 7916 ने भारत परिक्रमा अभियान पूर्ण करणार आहेत.राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल, आनंदधामचे संचालक लक्ष्मणराव मेहर यांनी हिरवी झेंडी दाखवून या दोघींना पुढील प्रवासासाठी रवाना केले.