उदगीर तालुक्यातील नळगीर येथील मुलीला फारकत देण्यासाठी लाव म्हणत उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण केल्या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, फिर्यादी रुक्मिणबाई जयसिंग पवार वय ७० वर्ष राहणार नळगीर यांना ८ सप्टेंबर रोजी साडे चार वाजेच्या दरम्यान उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपीने संगनमत तुझ्या मुलीला सोडचिठ्ठी देण्यास सांग म्हणून लथा बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली