बार्शी लातूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ चारचाकी वाहन अडवून चौघांनी गाडीची चावी काढून घेऊन जावयास अज्ञात कारणावरून अपहरण केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला शारदा या हळदी-कुंकू कार्यक्रमास बाहेर जायचे म्हणून त्यानी जावयास घेऊन त्यांच्या कारमधून जात होत्या. त्यावेळी चौघांनी गाडी अडवून त्यांचे अपहरण केले आहे.