भुसावळ तालुक्यातील दिपनगरजवळ जुन्या महामार्गावर शुक्रवारी १२ सप्टेंबर रेाजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हुजेब राऊत खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.