नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता माजी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात "मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी" या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.यामध्ये नांदुरा शहरातील शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याना माजी आमदार राजेश इकडे यांनी बक्षीस वितरण केले. यावेळी माजी आमदार राजेश एकडे यांनी आपले मत व्यक्त केले.