बाप्पांच्या आगमनानंतर आता घरोघरी गौराईचे सुद्धा आगमन झाला आहे, आणि या गौराईसाठी अनेक परिवार आकर्षक असा मखर सजवत असतात. असाच आगळावेगळा मखर वाशिमच्या मानधने कुटुंबाने सजवला आहे, तोही पन्नास रुपयांच्या नोटांपासून यासाठी त्यांना पन्नास रुपयांच्या 4000 नोटा अशा तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा लागल्या आहेत. आणि हा मखर बनवण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागला आहे.