राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करत असताना, सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी लोकशाही च्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना फासावर सरकार चढवणार का...? असा संतप्त सवाल सरकारला विचारला आहे.