जळगावातील सोनी नगर आणि पिंप्राळा परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रामानंद नगर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असून, याशिवाय लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे. शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सोनी नगरच्या विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या आरतीवेळी त्यांनी नागरिकांना या सूचना दिल्या.