भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे भेट देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम, आमदार संजय उपाध्याय, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.