सन 2025-26 या वर्षाकरिता बुलढाणा जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची सभा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाबाबत मागणी सादर करण्यासाठी सर्व नगरपरिषदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समित्या तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी आपली मागणी 25 सप्टेंबर पुर्वी कळवावी.