धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव रस्त्यावर एक बस गुरुवारी २८ ऑगस्ट सकाळी ७ वाजेच्या सुमारास झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली. या अपघातात बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.