वैराग माढा राज्य मार्ग क्र. 150 वरच्या खड्डयांनी अनेकांना हैराण केलं होतं. या खड्डयांमुळे अनेक अपघात झाले, अनेकांचे जीव धोक्यात आले पण प्रशासनाचे लक्षच नव्हते. या 'श्रीमंत' खड्डयांवर ५ सप्टेंबर दुपारी तीनच्या सुमारास दासरी प्लॉटच्या श्री राम गणेश मंडळातील चिमुकल्यांनी 'अमीर' उपाय शोधला. चिमुकल्यांनी एकत्र येऊन खड्डा बुजवण्याचे काम हाती घेतले. आरुष चव्हाण आणि राज आतकरे यांच्या नेतृत्वाखाली पारस कोरे, अमर मोरे, समर्थ कलाल, कुणाल भोसले, आर्यन बचूटे,आदी चिमुकल्यांनी खड्डा बुजवला आहे.