फलटण तालुक्यातील एका साठ वर्षाच्या महिलेवर, अत्याचार झाला असून, या संदर्भात अद्यापही पीडित महिलेला न्याय न मिळाल्यामुळे, पॅंथर विश्वास मोरे व पारधी समाज यांनी, आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे, महिलेवर अत्याचार होऊन देखील अद्यापही या महिलेला न्याय मिळाला नाही, त्यामुळे जोपर्यंत या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण माघार घेणार नसल्याचे पॅंथर विश्वास मोरे यांनी सांगितले, उपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात पारधी समाज सामील झाला आहे.