दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी परिसरात शनिवार, दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळपासून जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे येथील शेतकरी, नागरिक, तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात पाणी साचले असून, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्देहळ्ळी परिसरात काही ठिकाणी पाणी पुराव्यामुळे रस्ते वाहतुकीस असुविधा निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क आहे