सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका येथील ५७ वर्षीय शेतकरी महिला मंगलबाई रंगनाथ सांगळे यांना शेतातील विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी घडली. मंगलबाई सांगळे शेतात सोयाबीन निंदणीसाठी गेल्या असता शेतामध्ये विद्युत खांब असल्याने त्याला लावलेल्या तारेच्या ताणला करंट होता. त्या तारेजवळ निंदणी करताना त्यांच्या हाताला वायरचा स्पर्श झाला. पावसामुळे जमीन ओली असल्याने त्यांना जबर विजेचा शॉक बसला.