ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत लगतच्या ग्राम फुलचूरटोला येथील साई माउली कॉलनीतील रहिवासी अनिल आत्माराम शेंडे (५७) यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना गुरुवारी (दि. ४) पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनिल शेंडे हे आपल्या राहत्या घराच्या पोर्चमध्ये जिन्याच्या रेलिंगला दोरीने गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती श्याम भावराव कावळे (५२, रा. साई माउली कॉलनी) यांनी पोलिसांत दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक