रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. तर एका आरोपीला न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मिरजोळे येथील भक्ती मयेकर या या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला होता. भक्ती मयेकर हिच्या खुनाचा उलगडा होताच एका पाठोपाठ एक तीन खून झाल्याचे निष्पन्न होताच संपूर्ण जिल्हा हादरला. भक्ती मयेकर हिचा खून करून हैवान दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकला होता.