धुळ्यात महावितरणच्या वीजचोरी विरोधी मोहिमेत अधिकाऱ्यांना अडथळा आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वडजाई रोडवरील मिल्लत नगरमध्ये मीटर तपासणी करत असताना, रफिक शहा पठाण याने 'कारवाई थांबवली नाही, तर आत्मदहन करेन' अशी धमकी दिली. याप्रकरणी रफिकसह त्याच्या दोन साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याच परिसरातील हाफीज सिद्धी नगरमध्येही फरहान नावाच्या व्यक्तीने तपासणी मोहिमेला विरोध केल्याने त्याच्यावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.