जनविरोधी घटना विरोधी आणि लोकशाही विरोधी असलेल्या जन सुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे राज्यव्यापी जन आंदोलन आज करण्यात आले याच अनुषंगाने नागपुरातील व्हेरायटी चौक येथेही हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेस सह इतर घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कायदा रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी विकास ठाकरे यांनी दिला