गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर उमरखेड शहरात लाडक्या बापांचे थाटात आगमन झाले. सायंकाळी अंदाजे 6 वाजता शहरातील प्रमुख चौकात आणि विविध वाहनातून ढोल ताशांच्या निनादात स्थापनस्थळी वाजत गाजत नेत असलेल्या विविध मंडळाच्या व खेडेगावातील भक्त मंडळींच्या गर्दीने गणपती बाप्पा मोरया च्या घोषणाने परिसर फुलून गेला होता.