महाराष्ट्र शासनातील अधिकाऱ्यांची मगरुरी खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विशेषता कृष्णा विकास खोरे महामंडळातील अधिकाऱ्यांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, अनेक वेळा माहिती विचारून देखील माहिती देण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे. ते आज रविवार दिनांक सात सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अकलूज येथे पत्रकारांशी बोलत होते.