चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी- पुयारदंड दरम्यान असलेल्या मोखाबर्डी उपसा शिंचन कालव्याजवळ मौजा भिसी स्वतःचे शेतामध्ये दुपारी अंदाजे 5 वाजताचे सुमारास अचानक रान डुकराने गुलाब किसन खडसंग वय ६९ या शेतकऱ्यावर हमला करून उजव्या पायाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी वन विभाग भिसी येथे माहीती देऊन उपचाराकरिता पा आ केंद्र भिसी येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला उपजिल्हा रूग्णालय चिमुर येथे दाखल करण्यात आलेले आहे.