कारंजा येथील आसमानी नगर येथे घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गजाआड करण्यात कारंजा शहर पोलिसांना यश आले असून चोरट्याकडून 13000 रुपये रोख व एक मनगटी घड्याळ जप्त करण्यात आल्याची माहिती दि. 6 ऑक्टोबर रोजी कारंजा शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. चोरट्यांनी हज यात्रेसाठी कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या फिर्यादी अब्दुल जावेद माझी आसमानी यांच्या घरी दिनांक 27 जून 2025 रोजी चोरी केली होती.