शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपसरपंच सुनील बानखेले यांच्या संकल्पनेतून हे शिबिर मंगळवार, २३ तारखेला पार पडले असून, अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला.