वेताळे गावच्या ठाकरवाडी येथे नात्यातील मंडळींमध्ये जागेच्या वादातून महिलेला घराबाहेर काढण्याची धमकी देत चौघांकडून दोघांना लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अजय जाधव ज्ञानेश्वर जाधव आकाश जाधव व एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी 19 वर्षीय किशोर बाबू गावडे यांनी फिर्याद दिली आहे.