इंदापूर तालुक्यातील माळवाडी गावात सकाळी तरसाचा मुक्त संचार पाहायला मिळाला. पहाटे पाचच्या सुमारास हा प्राणी काही नागरिकांना दिसताच ग्रामस्थ त्याच्या मागे धावताना दिसले. त्यानंतर तरसाने उलट त्यांच्याच दिशेने धाव घेतल्याचे दृश्य सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले आहे.