माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे आज मंगळवार, दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बिरोबा विजयी दसरा यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील नामांकित पैलवानांनी हजेरी लावली होती. दमदार चाली आणि जोरदार फडताळ्यांमुळे प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पैलवानांना दाद दिली. गावातील तसेच परिसरातील कुस्तीप्रेमी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.