धुळे शहरातील खंडेराव बाजार परिसरातील प्रभाकर टॉकीज ते बाराफत्तर रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे दुरावस्थेत आला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचून अपघातांचा धोका वाढला आहे, तर धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले असून, कायमस्वरूपी काँक्रीट रस्त्याची मागणी केली आहे.