वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा नगर भागात काल दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास अचानक दोघांमध्ये रस्त्यावर हाणामारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हाणामारीमुळे स्थानिक परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार, नेमके कोणत्या कारणावरून वाद पेटला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र रात्री उशिरा झालेल्या या गोंधळात काहींना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.