आज गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात मुरूड, जि. रायगड येथे एस.टी. डेपोला महानगर गॅस लि. कंपनीमार्फत पंप सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुरूड परिसरातील एस.टी. वाहतुकीसाठी आवश्यक असणारी पंप सेवा स्थापन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.