गडचिरोली,जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील पोर्ला हद्दीत आज भीषण घटना घडली गडचिरोली तालुक्यातील. चुरचुरा येथील वामन मारुती गेडाम हा गुर चारण्याचे कामे करतो तो नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. मात्र रानटी हत्तीने त्याच्यावर हल्ला केल्याने हत्तीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे.