आज देशभरात दिसणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे धुळे शहरासह राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळे दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. खानदेशाची कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद असून, ग्रहण मोक्षकाळानंतर उद्या पहाटे ५ वाजता देवीला मंगलस्नान व पूजा-आरती करून मंदिर पुन्हा खुले होईल. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.