पारडी परिसरातील अंडरपास मध्ये शिवशाही बस अडकल्याची खळबळ जनक घटना आज घडली. याआधीही उडान पुलाजवळ असलेल्या लोखंडी बॅरिकेडमध्ये बस अडकल्याच्या घटना घडलेल्या आहे. आजच्या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. मधातच बस असल्यामुळे प्रवाशांचाही जीव भांड्यात पडला. बस चालकाला अंदाज न आल्यामुळे ही बस मध्येच फसली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसां तर्फे अंडरपास मधून बस काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.