धरणगाव शहरातील हेडगेवार नगरातून एका महिलेच्या घरातून मध्यरात्री सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण १ लाख ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना १२ ऑगस्ट मध्यरात्री १ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.