भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार/कोहळी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष मित्र मंडळाला वृक्षपट्ट्यावर दिलेल्या जागेतील झाडे बेकायदेशिरपणे कत्तल करून सरपंचांनी विकण्याचा प्रयत्न केला. लिजवर दिलेल्या जागेशी सरपंचानी वन विभागाची परवानगी न घेता मनमर्जीने झाडे कापून विकली आहे. आता या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे.