महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार नव्या श्रम संहिता रद्द कराव्यात, तसेच वैद्यकीय प्रतिनिधींसाठी कामकाजाचे स्पष्ट नियम तयार करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.