ज्यानी आम्हाला तुरुंगात टाकले, आमच्यावर गुन्हे दाखल केले, अशा महायुतीच्या नेत्यांचा आम्ही लोकसभा निवडणुकीत प्रचार कसा करायचा, असा सवाल मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता खेड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयाबाबत आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.